• Breaking News

  मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

  नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली

  नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली.सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला.हे असं किती दिवस चालणार.एकीकडे महाराष्ट पुरोगामी वगैरे म्हणायचे आणि आपल्याला वाटॆल तसे वर्तन करायचे..

  समाजाला आत्मचिंतन करावे लागेल .की अशा व्रुती का निर्माण होत आहेत..समाजाच्या हितासाठी झगड्णा-यांना जर अशी शिक्षा मिळत असेल तर....समाज किती रानटी अवस्थेत आहे..हे आपल्याला जाणवेल..दहशतवाद .ऩक्षलवाद या बाबी .....

  पूर्वसुचना देउन केल्या जातात..पण हा प्रकार मात्र ..नवीन जन्माला आला आहे.याचा गांभिर्याने विचार करा...प्रगती वगैरे गप्पा बाजुला ठेवा...या व्रुत्ती का निर्माण झाल्या याचा विचार प्रथम करा.

  २].. एका सज्जन ,मानवतावादी ,समाजवादी माणसाचा खुन होत असेल तर,,,ही समाजाची शेवट्ची घटका आहे..हे नक्की समजा..

  नरेंद्र दाभोळ्कर नावाच्या माणसाची आणि माझी भेट १९९९ मधे पत्र रुपाने झाली...मी चिंतनाच्या बाबतीत नवखा असुन सुद्धा या महान व्यक्तीने मला..समंजसपुर्वक उत्तर दिले.मी आंतरभारती ओराद शहाजानी जि.लातुर या उपक्रमशिल संस्थेत कार्यरत होतो...प्राचार्य सदाविजय आर्य सरांनी माझे पत्र वाचले....नरेंद्र दाभोळकर सर हे अजातशत्रु होते..प्रेमळ भाषा ,उत्साही आणि अंधश्रद्धा निर्मुलन या विषयाला वाहुन घेतलेले व्यक्तिमत्व ,,,महाराष्त्र कायमचा त्यांना आठवणीत ठेवेल....पण अशा मनोव्र्त्तीचे काय ? हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे..

  मारणा-यानीही विचार करायला हवा होता...समाजाच्या भल्यासाठी झगडणा-या माणसांना आपण हा न्याय देणार आहोत का ?

  मित्रांनो ,

  एक मात्र नकी .

  अंधश्रद्धा निर्मुलन ही चळवळ आता ...संपली...कारण ..असा व्यक्ती भेट्न्यासाठी समाजाला खुप वाट पहावी लागेल..

  साने गुरुजी यांच्या श्यामची आई हॆ पुस्तक घराघरात पोहोचण्यासाठी नरेंद्र दाभोळकर सर आणि प्राचार्य सदाविजय आर्य याचा मोठा पुढाकार होता.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या