• Breaking News

  रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

  हे पटकन समजून घ्या,इयत्ता दहावी इंग्रजी पेपर स्वरुप बदलले..आहे तरी कसे नवे स्वरुप..

  दहावीसाठी आता प्रश्नपत्रिका नाही."Activities sheet" चला तर मग काय आहे हा बदललेला  अभ्यासक्रम . राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाने २०१० मध्ये तयार केलेल्या प्रारूपानुसार नव्या अभ्यासक्रमामध्ये कृतीतून शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार आता इंग्लिश प्रथम भाषा आणि तृतीय भाषेच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे प्रारूपही बदलण्यात आले आहे. किंबहुना त्याला प्रश्नपत्रिका न म्हणता अ‍ॅक्टिव्हिटी शिट म्हणावे असा प्रस्ताव अभ्यास मंडळाने दिला आहे. आतापर्यंत इंग्लिशच्या पुस्तकामध्ये धडय़ांवर आधारित प्रश्न, व्याकरणावरचे प्रश्न अशाप्रकारचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. मात्र, धडय़ांवरचे प्रश्न हा प्रकारच नव्या प्रश्नपत्रिकेतून हद्दपार झाला आहे.
  त्याऐवजी विद्यार्थ्यांना भाषेचा वापर कशा प्रकारे करता येतो, भाषेचे आकलन किती आहे, या अनुषंगाने प्रश्न असणार आहेत.
  इंग्लिश तृतीय भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न हा नेहमीप्रमाणेच उताऱ्यावरील प्रश्नांचा आहे. मात्र, उताऱ्यावरील वस्तुस्थितीजन्य प्रश्नांऐवजी विद्यार्थ्यांच्या मतांवर आणि उताऱ्याच्या माध्यमातून त्याला कळलेल्या विषयाबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. दुसऱ्या प्रश्नातही उताऱ्याप्रमाणे कवितांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. लेखन कौशल्यावर या प्रश्नपत्रिकेत अधिक भर आहे. मात्र, त्यामध्येही मुद्दय़ांवरून पत्र किंवा निबंध लिहिणे या ऐवजी जाहिरात वाचून त्या अनुषंगाने स्वत:चे मत मांडणारे पत्र लिहिणे, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करून त्यावरून संवाद लेखन करणे, एखाद्या ‘पाय डायग्राम’ वरून परिस्थितीचा अहवाल तयार करणे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिकेची आकर्षक मांडणी हे या परीक्षेचे अजून एक वैशिष्टय़ आहे. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेती रूक्ष स्वरूपाला या नव्या पद्धतीमध्ये अजिबातच जागा नाही. भरपूर आकृत्यांचा, वेळप्रसंगी चित्रांचा वापर करून प्रश्नपत्रिका आकर्षक बनवण्यात आली आहे...नवीन पद्धत पाहुया..मंडळाने आपल्या वेबसाइट वर पेपरचे प्रारुप लोड कॆले आहे..प्रत्यक्ष त्यावर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.

  २ टिप्पण्या:

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या