• Breaking News

  शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

  विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट

  भारताची शिक्षणपध्दति ही भारताच्या इतिहासाच्या इतकीच पुरातन आहे, आणि भारताच्या संस्कृतीची ती एक घटक बनून राहिली आहे. शिक्षणाचा आद्य हेतु मानवाला जीवन जगण्यासाठी सिध्द करावयाचें, त्याचें जीवन संपूर्णतया समृध्द करावयाचें, त्या दृष्टीने या पध्दतीनें जसा चिंतनशील असा साधुपुरूष निमॉण केला, तसाच बाह्व जगाचीं कोडीं आपल्या तैलबुध्दीने उलगडणारा संशोधकहि निर्माण केला. त्याकरितां अनेक शिक्षणकेंद्रे स्थापन झालीं होतीं. त्यांत ज्ञानविज्ञानाची उपासना हेंच एक शिक्षणाचें ध्येय नसून ज्ञानप्राप्तीबरोबरच विद्यार्थी चारित्र्यवान् आणि नीतिवान् कसा निर्माण होईल ?याचीहि काळजी घेतली जाई. घरी किंवा शहरामध्यें शिक्षणाला अनुकूल वातावरण मिळूं शकत नाहीं म्हणून भारतीय शिक्षणकेंद्रे आश्रम, गुरूकुल व विद्यापीठें अशा स्वरूपाची असून तीं शहरापासून दूर असत. भारतीय आचार्य हे साधी राहणी व उच्च
  विचारसरणी असा जीवनादर्श ठेवून बाणेदारपणें आपलें स्वातंत्र्य अबाधित राखीत. व्यावसायिक शिक्षण देण्याच्या स्वतंत्र संस्था नव्हत्या व त्यांची गरजहि भासत नसें. वंशपरंपरागत व्यवसाय चालत असल्याने प्रत्येक धंद्यातील कसब नवीन पिढीला जुन्या पिढीकडून घरच्या घरींच मिळूं शकत असे. एकच कुटुंबपध्दतीचाहि या कामीं चांगला उपयोग होई. पुष्कळशा धंद्यांमध्ये दुसऱ्या कसबी कारागिराच्या हाताखाली उमेदवारी करून व्यवसायाचें ज्ञान मिळे. चवथ्या शतकापर्यंत जगांतील पहिल्यावहिल्या विद्यापीठाचें तक्षशिला विद्यापीठाचें १२०० वर्षे अखंड ज्ञानसूत्र चाललें होते. व्याकरणकार पाणिनी, राजधुरंधर चाणक्य (कौटिल्य), राजवैद्य जीवक आणि अनेक चतुरस्त्र विव्दान या विद्यापीठांत शिकून बाहेर पडले. पण त्या काळांतील हूणांच्या टोळघाडीनें ते विद्यापीठ विनाश पावलें.
  इत्यादी सर्व माहिती आपल्याला व विद्यार्थ्याला असणे अत्यंत महत्वाचे आहे.त्या माहितीवर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या