• Breaking News

  शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

  चला शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचीही अवकाशाची भन्नाट सफ़र करु या.

  खगोलशास्त्रावर आज सर्व भाषांमध्ये अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सुरवाती पासूनच भली मोठी पुस्तके न वाचता लहान आणि सोप्या भाषेमध्ये 'अवकाशाबद्दल ओळख' अशा प्रकारची पुस्तके वाचावीत. सुरवातीलाच मोठी पुस्तके वाचल्याने लगेच सर्व कळत नाहीच उलट अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच न कळल्याने कंटाळा येऊ लागतो आणि हा विषय फारच किचकट असून आपल्याला कळणार नाही अशी भावना निर्माण होते.त्यासाठी छोट्या अनुभवातुन आणि प्रसंगामधून विद्यार्थ्यांना याचा अनुभव देता येतो.
  इंटरनेटच्या माध्यमाने अत्याधुनिक माहिती ताबडतोब आपणास मिळते व खगोलशास्त्रावरील शेकडो वेबसाइट्स आहेत. म्हणून पुस्तके वाचना सोबत कॉम्प्युटरवरील इंटरनेटद्वारे खगोलशास्त्रावरील माहिती मिळवावी.

  त्यामुळे नवीनच लागलेल्या शोधाबद्दल अथवा संशोधनाबद्दल आपणास माहिती मिळेल.मग ही अंधाराची सफ़र करण्यासाठी तयार.येथे हळुवार क्लिक करा

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या