• Breaking News

  शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

  TET सर्व विषयांचा अभ्यास एकाच ठिकाणी..याच ब्लोगवर.

  TET मित्रांसाठी मी मागच्या पॊस्ट मधे काही महत्वाच्या विषयावर अभ्यास ,मनन ,चिंतन करण्यासंदर्भात टीप्स दिल्या होत्या...त्या तुम्ही पाहिल्या..अभ्यास हा पुस्तकापेक्षा ओनलाइन अधिक ठेवा.कारण पुस्तकात हव्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.पण नेटवर त्वरित उत्तर भेटते.
  आज मी तुम्हाला अशा वेबवर घेउन जाणार आहे.तिथे सर्व विषय तर आहेतच याशिवाय ओनलाईन प्रश्नपत्रिका आहेत.त्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा..tet साठी हा पर्याय मला अधिक मोलाचा वाटतो.सतत अभ्यास करत बसण्यापेक्षा जेंव्हा तुम्हाला प्रशस्त वाटेल तेंव्हाच अभ्यास करा.
  'अभ्यासाला बस.' 'अभ्यास कर.' ही सारी निरर्थक वाक्ये आहेत. बाकीच्या गोष्टी आपणहून कराव्याशा वाटतात, मग अभ्यास का करावासा वाटत नाही? कारण एकच. मनाची ओढ अभ्यासाला लावलेली नाही. अभ्यास ही मनाविरुद्ध बाब नाही. ती श्वासोच्छवासाइतकी नैसगिर्क क्रिया आहे. कुतूहल जिवंत ठेवले की अभ्यास येतो. माझ्यातला मी सतत जागता असला की कुतूहल येते. त्यासाठी संवेदना राखाव्याच लागतात. अभ्यासाला हजारो रुपयांच्या नव्या बॅग्ज आणल्या तरी अभ्यास आतून फुटेलच असे नाही. त्यासाठी मोजक्या निरीक्षणांची गरज लागते. मन प्रसन्न लागते. मनाला मारून मुटकून क्लासला घातले म्हणजे अभ्यास नाही येत. अभ्यासात पुन्हा पुन्हा मधमाशीसारखे वाचावे लागते. कळल्याशिवाय पुढे गेले की अभ्यास ढेपाळतो.एक सांगतो सद्या classes चे विषारी पीक फ़ार भयानक आहे.तेंव्हा कोणत्याही क्लासच्या जाहिरातीला बळी पडु नका.अगोदर फ़ीस वसूल केली जाते.नंतर पश्चाताप दिला जातो..मी दिलेल्या लिंक पहा..आणि बिनधास्त रहा..या महत्वाच्या लिकवर जाण्यासाठी
  येथे क्लिक करा.  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या