• Breaking News

  बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

  चला आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम समजून घेऊ य़ा..

  १] बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र..या विषयाच्या संदर्भात विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील.अध्ययन प्रक्रिया बाबतीत अधिक जोर प्रश्नावर दिला जाईल.अभ्यास करताना एक विचारात घ्या की.तुमची भूमिका काय असणार आहे.एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करु शकता हे महत्वाचे आहे.सद्याचा अभ्यासक्रम हा शिक्षककेंद्रित नसून तो विद्यार्थी केंद्रित आहे.मग विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार सद्याच्या अभ्यासक्रमात कसा प्रतिबिंबीत झाला आहे.याचा विचार करा.
  अध्ययन प्रक्रिया.शिक्षणात मानसशास्त्राची भूमिका काय आहे,प्रयोग आणि त्याचे महत्व,वयाचा अध्ययन प्रक्रियेवर होणारा परिणाम कोणता.अशा मुलभूत बाबीवर प्रकाश टाकला जाईल.
  २] भाषा..मराठी ,इंग्रजी व उर्दु .
  भाषा हा विषय आपल्याला जसा सोपा वाटतो.तो तितकाच धोका देतो.कारण आपण महत्वाच्या बाबीकडॆ नजर टाकत नाही.यात लेखक कवी आणि त्यांची ग्रंथसंपदा कोणती.हे जसे महत्वाचे आहे.तितकेच भाषिक कौशल्य कोणती ती कशा प्रकारे अभ्यासक्रमातून साध्य करता येतील.याचा विचार महत्वाचा आहे.
  भाषा आणि व्याकरण यांचा संबंध जवळचा आहे.तुम्ही व्याकरणात शब्दांच्या जाती ज्या आठ आहेत त्या अगदी जवळुण अभ्यासा.अलंकार आणि विभक्ती.प्रयोग व समास यानाही महत्वाचे स्थान आहे.इंग्रजी मधे काळ.सहाय्यक क्रियापदं व पर्यायी शब्द याचाही अभ्यास करा.
  भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी कोणते उपक्र्म महत्वाचे आहेत.
  ३] गणित व विद्न्यान ..
  १ ते ५ किंवा ६ ते ८ या पेपरसाठी गणित व सायंन्स या विषयावर प्रश्न विचारले जातील.यात प्रामुख्याने मुलभुत संबोध व तार्कीकता समस्या निराकरण .गणित विषयाचे शिक्षणात महत्वाचे स्थान कसे आहे.त्याचे अध्यापन करताना कोणत्या अध्यापन पद्धती अधिक महत्वाच्या ठरतात.त्यासाठी कोणते उपक्रम आवश्यक आहेत.४ ते ८ पर्यंतच्या इयत्तांचा अभ्यास करा आणि गणित अध्यापन पद्धती अभ्यासा.बस्स एवढे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास पुरेसे आहे.
  ४] परीसर अभ्यास..
  परीसर अभ्यासात इतिहास ,नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.यांचा सुक्ष्म अभ्यास करा.हे विषय तुम्हाला चांगले गुण मिळवून देण्यास मदत करतात.

  परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार राहील. पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास. नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.हे सर्व विषय आहेत पण सर्व पाठ्यपुस्तकात विखुरलेले आहेत.हे समजूण घ्या.


  या नंतरच्य़ा पोस्टमध्ये मी नमुना प्रश्नपत्रिका देतो.तोपर्यंत
  प्रतीक्षा ....

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या