• Breaking News

  शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

  मित्रांनो चला एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करु या.काही सुंदर विचारांची.


  प्रत्येक दिवाळी आपण आनंदाने साजरी करतो.यासाठी शुभेच्छाही देतो.एक आनंदाचा सण म्हणून आपण या सणाकडे पाहतो.अलिकडे मात्र या सणातला गोड्वा हरवत चालला आहे.माझ्या लहाणपणापासून मी ऐकत आलो आहे की, या वर्षी आपण दिवाळीला फ़टाके
  वाजवणार नाही.तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहित नाही पण आपल्या या क्षणिक आनंदासाठी कोण आपले मौलिक जीवन हरवून बसते.दरवर्शी हजारो लोक बहिरे होतात.लहान मुलांना कायमचे बहिरेपण येते.ती बारुद जर चेह-यावर पड्ली तर चेहरा कायमचा काळा पड्तो.गर्भवती महिलेने जर हा जोराचा आवाज ऐकला तर ते बाळ दचकते आणि बहिरेपणा
  येतो.फ़टाक्यांचा धुर जर डोळ्यात गेला तर,डोळे बरेच दिवस जळ-जळ करतात व नजर कमी होते.या काळात गायी,म्हशी कमी दुध देतात.कारण फ़टाक्याच्या आवाजामुळॆ त्यांना पान्हा सुटण्यास त्रास होतो.फ़टाक्याच्या कारखान्यात काम करणारी लहान मुले स्फ़ोटात बळी पडतात.महिला दगावतात व त्यांचे संसार उघड्यावर पडतात.
  या दिवसात बाजारात नकली मिठाई भरपूर येतात.त्या खाल्यामुळॆ -हदय रोग वाढतात,मधुमेही जग सोडुन जातात.चेह-यावरचे चैतन्य जाते.त्वचारोग बळावतात.शासनाने यावर्षी मोठी जाहिरात देऊन जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे पण भेसळ करणा-यांवर काय कारवाई  होते.याबद्दल न बोललेले बरे.
  मी तुम्हाला शुभेच्छा देतो..याबद्दल काही जरुर विचार करावा.काही फ़ोटो देत आहे.त्यावर काही बोलता आले तर बोला.धन्यवाद....
  1]

  2]

  3]

  4]


  5]

  6]


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या