• Breaking News

  बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

  फ़ेसबुक प्रेमींनो फ़ेसबुक प्रेमातील धोके समजून घ्या.

  फ़ेसबुक याचा अर्थच मुळात "चेह-याचे पुस्तक" हा आहे.ते विचाराचे पुस्तक नाही.चेहरे वाचता येतात पण चेह-यांसोबत जगता येत नाही.आपल्याला शेवटी विचारासोबतच जगावे लागते.विचार हाच माणसांचा खरा सोबती आहे.पण अलिकडे फ़ेसबुक एक नशा होऊन तरुणाई त्यात बेहोश झाली आहे.फ़ेसबुक तुमचा मित्र नाही हे कायमचे लक्षात ठेवा.फ़ेसबुक बद्दल विनोदाने असे म्हंटले जाते की, "फ़ेसबुक वर त्याचे हजार मित्र पण विचारत नाही त्याला गल्लीतलं कुत्रं" यात जेवढा विनोद आहे तेवढे गांभिर्य ही आहे.फ़ेसबुक तुम्हाला एका मर्यादेपर्यंत संधी देते.अधिक काही करण्यासाठी तुम्हाला कधीच संधी देत नाही.तुम्हाला html  कोड वापरता येत नाही,तुम्हाला एखादी जाहिरात देता येत नाही,एखाद्या वेबचा प्रचार करता येत नाही.फ़क्त इमेज टाका आणि कमेंट्स द्या.

  फ़ेसबुक एक कंपनी आहे.तुम्ही जेवढे क्लिक त्यावर कराल तेवढे पैसे त्या कंपनीला मिळतात.वास्तविक आपल्या फ़ेसबुक पेजवर जेवढे क्लिक झाले तेवढे पैसे आपल्याला मिळावयास हवे पण ती देत नाही.तुमच्या मतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक साधने आहेत.पण आपण त्याचा वापर करत नाही.ब्लोग काढा किंवा वेबसाईट काढा त्यावर जाहिराती घ्या.तुमचे मत जगासमोर ठेवा.बिनधास्त पैसे कमवा.
  आजपर्यंत माझे फ़ेसबुकचे अकाउंट कितीतरी वेळा कंपनीने बंद केले.मला त्यात रस नाही पण ब्लोगवरील माहिती मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची गरज पडते.मी फ़ेसबुकला त्रास देतो.मी देणारच कारण माझ्या क्लिकचे पैसे ही कंपनी वापरते.
  मित्रांनो,अलिकडॆ फ़ेसबुक मुळॆ फ़ार मुले मुली विचीत्र फ़ोटो आणि विचीत्र कमेंट्स मुळॆ परेशान आहेत.काहींनी आत्महत्याही केल्या आहेत.तुम्ही असे मित्र निवडता कशाला ? जर चुकीने निवड्ले गेले असतील तर अन्सबस्क्राईब करा.प्रथम तुमचे विचार चांगले असू द्या.तुमच्या संपत्तीचे प्रदर्शन त्यात कधीही करु नका.आजही जगात चांगल्या मित्रांची वानवा नाही.फ़क्त तुमचा शोध कमी पडतो आहे.
  तुम्हाला माहित असेलच एखाद्याचे फ़ेसबुक त्रासदायक वाटत असेल तर ते आपल्याला बंद करता येते.कायमचेच.

  तुम्हाला जर असे कोणी त्रास देत असेल तर.त्याची फ़ेसबुक आयडी मला मेल करा व सोबत तुमचीही आयडी मला मेल करा.मी दोन सेकंदात त्याला फ़ेसबुक मधून रिटायर करतो.जगात जेवढे वाईट आहे तेवढेच चांगलेही आहे.हे लक्षात ठेवा.
    चला तर मग तुम्हाला जर कधी त्रास अनावर झाला तर.बिनधास्त मेल करा.आणि आनंदी रहा.    
       narenbharati4@gmail.com

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या