• Breaking News

  बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

  गुगल सरसावले महिलांना संगणक साक्षर करण्यासाठी.

  गुगल कधी काय करेल हे सांगता येत नाही.अतिशय कल्पक मनुष्यबळ असलेली ही कंपनी वेगवेगळॆ प्रयोग करण्यात यशस्वी आहे.जगाच्या बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवायचे असेल तर हे आवश्यक
  आहे.आजही महिलांना संगणकाबद्द्ल आवश्यक माहिती नाही.त्यात ग्रामीण भागातील महिलांना तर अजिबात नाही. त्यांनाही या प्रवाहात आणण्यासाठी गुगल ने एक झकास वेबसाईट तयार केली आहे.ही वेबसाईट महिलांना संगणकाचे प्राथमिक शिक्षण देते.यातुन महिलांची संगणक जाणीव अधिक प्रगल्भ होईल अशी अपेक्षा गुगलची आहे.
  इंटरनेट बद्द्ल माहिती देणे,हा मुख्य उद्देश या वेबसाईटचा आहे.विद्यार्थीनी आणि महिला यांच्यासाठी ही खास वेबसाईट आहे.तुम्हाला जर संगणक आणि इंटरनेट याबद्दल अधिक माहिती करुन घ्यावयाची असेल तर तुम्ही अवश्य या वेबला भेट द्या आणि जाणून घ्या हे नवे जग.

  गुगलच्या या खास वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या