• Breaking News

  रविवार, २९ डिसेंबर, २०१३

  आयसीटीचा शिक्षणावर होणारा परिणाम ....

  जगातील एकंदर माहितीचा साठा दर चार वर्षामधे जवळपास दुपटीने वाढतो या माहितीच्या विस्फ़ोटाला सामोरे जाण्यासाठी त्यात तग धरण्यासाठी आय.सी.टी.महत्वाची भुमिका बजावते.या माहितीच्या विस्फ़ोटाकडे आपण दुर्लक्ष केले तर आपली माहिती कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे.आय.सी.टी या सर्व प्रकाराला मदत करणार असून ते मानवाला वरदानच ठरणार आहे.याचा शिक्षणावर नेमका कोणता परिणाम होतो याचा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे...
  * आय.सी.टी.मुळे स्वयंअध्ययनाने  अनेक गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतात तसेच एखादी बाब वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तद्न्याकडून शिकणेही शक्य होते.उद..ईंटरनेट,ब्लोगींग,टायपींग,प्रिंटींग,स्पीकींग,आणि ओनलाईन
  ईतर बाबी.
  *आय.सी.टी.मुळे विद्यार्थ्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी व सोयीच्या वेळी शिकता येते.जसे.गणित.भाषा,व्याकरण,ऐतिहासिक किल्ले,ऐतिहासिक दस्तावेज.
  *भौतिक आणि भौगोलिक अडथळे ओलांडूण संप्रेषण प्रस्थापित करणे आय.सी.टी मुळे शक्य होते.त्यामुळे शाळा आणि बाहेरील जग यांच्यामधील सीमारेषा पुसून टाकणे शक्य झाले आहे.एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करत शिकण्याला माहिती संपेषण तंत्रद्न्यान पोषक आहे.उदा.भारतातील विद्यार्थी जपानच्या शिक्षकाकडून ओनलाईन शिकवणी घेऊ शकतो.तर आफ़्रीकेतील जंगलाविषयीची माहिती घरी बसून घेता येते.नासाच्या महत्वाच्या उपक्रमाविषयी आपल्याला कोठेही माहिती मिळवता येते.
  *आधुनिक जगाचे  अविभाज्य अंग बनलेल्या तंत्रद्न्यानाची ओळख नवीन पीढीला होण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्र निश्चीतच उपयोगी ठरु शकते.
  *कोणत्याही ठिकाणी असलेल्या शाळामधे शिकणा-य़ा विद्यार्थ्यांना जगभरातील उत्तम शिक्षकांकडून शिकता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आय.सी.टी.मधे आहे.
  *ईंटरनेट आणि ईतर तंत्राचा वापर करुन वर्गात शिकणा-या मुलांना थेट संशोधन संस्था प्रयोगशाळांमधे संशोधन करणा-या शास्त्रद्न्याशी संवाद साधने चर्चा करणे आय.सी.टी.मुळे शक्य होणार आहे.
  *आय.सी.टी मुळे शिक्षणातील पुढील चार उद्दीष्टॆ साध्य होतात.
  १.जास्तीत जास्त लोकांना सर्व स्तरावरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे.
  २.शिक्षणाचा दर्जा उंचावणे.
  ३.निरंतर नवनवीन गोष्टी शिकत राहणे.
  ४.अनौपचारिक शिक्षणात मदत.    

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या