• Breaking News

  सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

  एक खास सोफ़्टवेअर मराठी टंकलेखनासाठी..

  संगणकावर काम करण्यासाठी टंकलेखन ही बाब अतिशय महत्वाची आहे.बाजारात खूप सोफ़्टवेअर आहेत पण सर्वसमावेशक सोफ़्टवेअर म्हणून बरहाकडे पहावे लागते.यात असलेले बहुविध पर्याय आपल्या टंकलेखनात सुकरता निर्माण करतात.यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाषा रुपांतरीत करता येते.व आपण की पैड वर ईंग्रजी टाईप केल्यास मराठीत शब्दांकनाची सोय आहे.

  मला टंकलेखनाच्या बाबतीत आवड्लेले सर्वाधिक महत्वपूर्ण सोफ़्ट्वेअर म्हणजे बरहा होय..ज्यांना मोबाईलवर एस.एम.एस.पाठवता येतात त्यांच्यासाठी हे सोफ़्टवेअर म्हणजे एक वरदानच आहे.तुम्ही जर ब्लोगर असाल तर तुमचे टंकलेखनाचे काम अगदी आरामात पूर्ण होते.हे आकाराने अगदी लहान आहे.एकदा डाउनलोड करुन घ्या.व तुमच्या संगणकात ईंस्टाल करा.बस्स तुमचे कोणतेही काम अगदी आरामात पुर्ण होईल.यासोबत एक बरहा पैड आहे.ते ही महत्वाचे आहे.ब-याच वेळा आपण वेबवरील माहिती जमा करतो.या पैड वर ती ठेवण्याची सोय आहे.आहे की नाही मजेशीर सोफ़्टवेअर...चला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या