• Breaking News

  शनिवार, ११ जानेवारी, २०१४

  चला मराठी पुस्तकांच्या विश्वात..तेही मोफ़त पुस्तके.

  प्रिय मित्रांनो.
  तुम्हाला थोडेसे नवल वाटत असेल की.मराठी शिक्षकांने मधेच इंग्रजी पोस्ट कसे काय सुरु केले.त्याचे कारण सांगतो.माझा ब्लोग आता ब-यांपैकी वाचकापर्यंत पोहोचला आहे.गुगल ऐड्संस साठी मराठी भाषेचा ब्लोग चालत नाही.यासाठी काही इंग्रजी भाषेतील पोस्ट दिसतील. प्रयत्न करतो.गुगल माझा ब्लोग स्विकारते का ? जर स्विकारले तर ब्लोगचे रुपांतर वेबसाईट मधे करेन.चांगले पैसेही मिळतील तेंव्हा तुमचे प्रेम,प्रेरणा अशीच राहू द्या.बस्स. 

  मला एका वाचकांनी मराठी पुस्तके मिळण्याची लिंक द्या.अशी मागणी केली होती.मराठीत फ़ार कमी पुस्तके वेबसाईट वर टाकण्यात आली आहेत.हा प्रकाशकांचा चुकीचा मार्ग आहे.हातात पुस्तके धरुन वाचण्याचे दिवस संपत आले आहेत.मोबाईल बुक आता हवी आहेत.जो ही तहान भागवेल त्याला प्रथम प्राधान्य.माझी आवडती एक वेबसाईट आहे.त्यावर तुम्हाला ३०० पुस्तके मिळतील.ती सर्व पीडीएफ़ फ़ाईल मधे आहेत.ती घ्या सेव करुन ठेवा.
  मी सुरुवातीपासुनच सांगत आलो आहे.फ़सवण्याचे प्रकार खुप वाढलेत.जे स्वस्तात मिळेल तेच पारखुन घ्या.माझा प्रयास हाच राहील की,जे मोफ़त आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचे.मी तुमची फ़सवणूक व्हावी ब्लोग चालवत नाही.
  आज जी वेबसाईट तुम्हाला मी सांगतो आहे ती फ़ारच अप्रतिम आहे.अवश्य पहा.भेट द्या.माझी ही पोस्ट कशी वाटली ?  टिपण्णी द्या.आग्रह नाही..
  ३०० पुस्तके वाचकांसाठी तेही मराठीत यासाठी येथे क्लिक करा.

  ३ टिप्पण्या:

  1. नरेनजी.
   ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े आपले खूप खूप आभार." ई पुस्तके फ़्री पुस्तके इझी पुस्तके" या अभियानात आपले वाचक सामिल व्हावेत हीच अपेक्षा.
   अजून एक सांगू इच्छितो. वाचकांना पुस्तके मिळणे जितके अवघड आहे, त्याहून कितीतरी पटींनी मोठा प्रश्न आहे, चांगल्या लेखकांना वाचक मिळणे. कारण पुस्तक छपाई खर्चिक आहेच. पण पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणे हे त्याहून क्ठीण काम आहे. कारण लेखकाचे नाव माहित नसेल तर लोक पुस्तक खरेदी करण्याचे टाळतात.
   अशा वेळी आम्ही नवीन लेखकांची पुस्तके विनामूल्य प्रकाशित व वितरित करतो. सुमारे दोन लाख वाचकांपर्यंत ही पुस्तके ई मेलने जातात व लाखो लोक ती वेबसाईटवर वाचतात. वाचक व लेखक अशा दोहींना सोयीची ही चळवळ आहे.
   अशा चळवळीला मदत केल्याबद्दल आपले अनेकानेक आभार.

   सुनिल सामंत
   अध्यक्ष
   ई साहित्य प्रतिष्ठान

   प्रत्युत्तर द्याहटवा
   प्रत्युत्तरे
   1. मला वाटते मराठीतला हा सरस स्तुत्य उपक्रम आहे.हीच जाणीव ,हीच भुमिका कायम ठेवा.एक दिवस वाचकांची पहिली पसंती याला असेल.
    धन्यवाद !

    नरेन भारती.

    हटवा
  2. धन्यवाद नरेनजी

   आपण दिलेली लिंक आता नाहिशी झालेली दिसते.
   लोकांनी कृपया खालील लिंकवर टिचकी मारावी
   www.esahity.com

   धन्यवाद

   सुनिल सामंत

   प्रत्युत्तर द्याहटवा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या