• Breaking News

  बुधवार, १५ जानेवारी, २०१४

  माहिती धिष्ठित शालेय शिक्षणातील नाविन्यता..


  एकविसाव्या शतकाचा प्रारंभच आपण आय.सी.टी.ने केला आहे.मानवाच्या प्रगतीची वाटचालच मुळी शेतीनिष्ठ समाजापासून ते औद्योगिक समाजापर्यंत गेल्या चार-पाच दशकात मोठ्या प्रमाणात झाली.औद्योगिक समाजापासून आता माहिती तंत्रद्न्यानाकडॆ वाटचाल सुरु झाली आहे ही फ़ार मोठी क्रांती म्हणावी लागेल.बदलाचा वेग प्रचंड आहे.मानवाला आजही माहितीची क्षेत्र अनभिद्न् च राहिली आहेत.दररोज होणारा माहितीचा स्फ़ोट य़ाला कवेत घेण्यासाठी मानवाचे हात कमी पडत आहेत.एकीकडे असे चित्र तर दुसरीकडॆ वेगळेच चित्र पहावयास मिळते आहे.
  माहिती आधारित समाज निर्माण होत असताना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.आजही देश,शहरी-ग्रामीण ,इंडिया -भारत असा विभागला जात आहे.देशाचे हे विभाजन बाजूला ठेवून आपण नव्या क्रांतीला सामोरे जात आहोत.अशा वेळी भारतापुढील दारिद्र्य,विषमता,मागासलेपणा,लोकसंख्या,इत्यादी अनेक प्रश्न आपण नव्या युगात सोडवू की अधिकच मागास होऊ हा एक चिंतनाचा विषय आहे.
  जागतिकीकरणाच्या व उदारीकरणाच्या या लाटेत आमची संस्क्रती आम्ही टिकवून ठेवू की बदलाच्या ओघात वाहून जावू असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.हे सर्व स्विकारत असताना आमच्यातील माणूसपण हरवत जात असेल तर या आधुनिक बदलाचा विचार करावा लागेल.हे सर्व सकारात्मक दिशेने न्यावयाचे असेल तर त्यासाठी उत्तम शिक्षण हाच एक पहिला आणि शेवटचा पर्याय आहे.भावी पिढीच्या शिक्षणाचा पाया एकविसाव्या शतकात जर सुयोग्य पद्धतीने घातला गेला तर नवसमाजाची उभारणी भरभक्कम पायावर होईल.देशापुढील व शिक्षण क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यास यश मिळेल,हा एक विश्वास व अपेक्षा आय.सी.टी. कडून केल्या जात आहेत.यासाठी शालेय शिक्षणापुढील समस्या,महत्वाचे प्रश्न,आय.सी.टी.चा शिक्षणात उपयोग,त्यातून निर्माण होणारे नवे शिक्षण आणि नवे पर्याय यांचा ताळमेळ बसवणे व त्यातून समाजहित साधने हे गरजेचे आहे.
  आपण शिक्षणांमध्ये आघाडीवर असूनही पाचवीपर्यंत गळतीची संख्या २१% मुलींची २३% ती दहावीपर्यंत ५९% वाढते.

  आजही शाळेबाहेर असणा-यांची संख्या ही प्रचंड आहे.ती पाहता १० वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण सार्वत्रिक करण्यापासून आपण खूप दूर आहोत याची प्रचीती येते.नुसता कागदोपत्री ताळमेळ बसवून शिक्षण प्रत्येकाच्या दारापर्यंत गेले याचा आभास निर्माण करणे चुकीचे ठरेल.

  ग्रामीण व शहरी जागतिक भेद.
  शिक्षण आणि समाज कितीही प्रगत झाला तरी ग्रामीण व शहरी भेद यातून काही बाहेर पडत नाही.आम्ही पदवीला असताना अभ्यासक्रमात या भेदाचा विचार होता.त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना आखल्या होत्या त्या आजही अभ्यासक्रमात आहेत.कारण मानसिकताच तयार होत नाही यातला भेद दूर करण्याची.जोपर्यंत ग्रामीण भागात राहून शहरी भागातील सर्व सुविधा व सोयी सहज साध्य होऊ शकत नाहीत तोपर्यंत शहरीकरणाची प्रक्रिया थांबेल.आजही ब्राड्बेंड व थ्रीजी सेवा ग्रामीण भागात नाहीत याचा परिणाम असा झाला की ईंटरनेट द्वारे माहिती संकलनाची गती मंदावली भेद निर्माण झाला.
  खेड्याकडे चला ही प्रक्रिया सुरु करुन ग्रामीण भाग सम्रुद्ध करण्यासाठी शहरी भागातील आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी माहिती तंत्र.चा उपयोग मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडणार आहे.
  ग्रामीण भागातील शाळांना,शहराइतक्या सुविधा देता येतील काय ? चांगल्या शाळांतील शिक्षक व उपक्रमांचा विनियोग इतर शाळांना करता येईल काय ? मी जगाशी जोड्ला गेलो आहे.त्याचा फ़ायदा मी ईतरांना किती करुन देऊ शकतो ?ग्रामीण भाग संपन्न करण्यासाठी माझ्याकडील उपलब्ध साधनांचा कितपत वापर करु शकतो ? ग्रामीण भाग जगाशी जोडण्यासाठी मी किती मदत करु शकतो?
  अशा अनेक प्रश्नांचा विचार आपण करु या.आज एवढेच.बाकी नंतरच्या पोस्ट मधे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या