• Breaking News

  बुधवार, २९ जानेवारी, २०१४

  महाराष्ट्र शासनाचे नवीन शिक्षक प्रशिक्षण धोरण काय आहे ?


  महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत चालवलेल्या प्रशिक्षणाला आता नवा चेहरा प्राप्त होणार आहे.यापूर्वी जी प्रशिक्षण झाली त्यात एक औपचारिकताच होती पण आता त्यात बदल होणार आहे.ऐनवेळी साधन व्यक्ती उभा करणे,प्रशिक्षण भत्ता न देणे,प्रशिक्षण साहित्य न देणे.नियोजनाचा अभाव,पूर्वसूचना न देणे,प्रशिक्षणास उपस्थित न राहणे,जेवण नाष्ता न देणे,प्रशिक्षणातील बाबींचे अनुधावन न करणे,प्रमाणपत्र न देणे,प्रशिक्षणाचे गांभिर्य न ठेवणे,प्रशिक्षणाचे उपयोजन अध्यापनात न करणे,प्रशिक्षणाचे आउट्पूट न तपासणे,प्रात्यक्षिकापेक्षा व्याख्यान पध्दतीचाच वापर अधिक करणे,प्रशिक्षणार्थ्यांची योग्य निवड न करणे,प्रभावी साधन व्यक्तीची योग्यता न तपासणे,प्रशिक्षण काळातील छोट्या प्रकल्प निर्मीतीचा अभाव,प्रभावी प्रकल्पाचे उदात्तीकरण आणि अनुकरण यांना प्राधान्य नसणे,प्रशिक्षणाचा गाभा हा विद्यार्थी केंद्रीत न ठेवता तो शिक्षक व पाठ्यपुस्तक यांनाच प्राधान्य देणे,प्रशिक्षणाची फ़लश्रुती आणि उणिवा याबाबत आत्मपरिक्षण न करणे अशा काही बाबीवर चालणारी प्रशिक्षणं आता कात टाकणार आहेत. या प्रकाराला आता कायमचा पूर्णविराम लाभणार आहे ?.
  आता ही प्रशिक्षणं नव्या तंत्रद्न्याचा वापर करुन घेतली जाणार असून त्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.मित्रांनो प्रशिक्षण नको कोणाला आहेत? ती दर्जेदार झाली पाहिजेत जी घेतल्यामुळे अध्ययन आणि अध्यापनात नवचैतन्य येईल.विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून संपन्न झालेली प्रशिक्षणं आपल्याला दिशा देतात.
  मग यासाठी आता योग्य,प्रभावी,जिद्न्यासू,चिंतनशिल अशा शिक्षकांचा शोध सुरु झाला आहे.त्यासाठी नव्या तंत्राचा किती अभ्यास व वापर आपल्या अध्यापनात करत आहात हे महत्वाचे आहे.जर नसाल तर अशी प्रशिक्षणं घेण्यास तयार रहा.
  शासनाने यासंदर्भात एक विशेष शासन निर्णय काढला आहे.त्याचा अभ्यास करा.जर होणा-या बदलांचा आपण स्विकार नाही केला तर आपले विद्यार्थी आपल्याला मागे टाकतील हे नक्की.मग आता विसरा प्रशिक्षणांची जुनी पद्धत आणि तयार रहा नव्या प्रशिक्षण पध्दतीचे स्वागत करण्यासाठी.
  तो महत्वाचा छोटा शासन निर्णय(GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.      

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या