• Breaking News

  रविवार, ५ जानेवारी, २०१४

  आय़.सी.टी.ची भरारी आणि भविष्यातील संधी.  या लेखमालेतील हा लेख लिहितांना मला याचा आनंद होत आहे की.वाचकांच्या प्रतिक्रिया याबाबतीत अधिक येत आहेत..माहिती संप्रेषण तंत्रद्न्यान म्हणजेच आय.सी.टी.होय याचा प्रत्यय  शिक्षक आणि विद्यार्थ्यांना येतो आहे.प्रचंड प्रमाणात माहितीची देवाणघेवाण वाढली आहे.यातून माणसांची माहिती संकलनाची गती ही वाढली आहे.माहितीचे संप्रेषणही अधिक समर्पक झाले आहे.यातून पाश्चात्य संस्क्रती आणि आपली संस्क्रती यातील माहितीच्या मर्यादा आता कमी होत आलेल्या आहेत.
  जगात नेहमी एका व्यवसायाची जागा दुसरा व्यवसाय घेतो.एकाच व्यवसायावर अवलंबून राहणे धोक्याचे असते.उदा.संप्रेषणासाठी अगोदर एस.टी.डी.चा वापर केला जायचा.मोबाईल आले आणि हा व्यवसाय मोडीत निघाला.मोबाईल व्यवसाय तेजीत आला.तंत्रद्न्यान नेहमी बदलत राहते.येणा-या प्रत्येक बदलासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे.यासाठी आपले कौशल्यही अद्यावत ठेवावे लागते.आय.सी.टी.आपल्याला याच बाबीवर प्रकाश टाकण्यास प्रेरणा देते.विद्यार्थी याच काळात आपले ध्येय निश्चित करतात.त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा काळ आहे.आय.सी.टी.भविष्यातील अनेक संधीवर प्रकाश टाकते.आणि त्यासाठी तयारही करते.

  १.रोजगार.
  २.माहिती.
  3.संप्रेषण.
  ४.तंत्रद्न्यान शिक्षणाची अधिक गती.
  ५.मार्केटींग.
  ६.घरी बसून मोठा व्यवसाय करण्याच्या अनेक संधी.
  ७.subject expert ना ओनलाईन शिकवण्याच्या अमर्याद संधी.
  ८.जाहिरात करण्याचे हजारो मार्ग.
  ९.प्रत्येक कौशल्याला संधी.
  अशा विविध प्रकारे मानवाला आय.सी.टी.अनेक मार्गाने मदत करणार आहे.याचा अभ्यास आपण जसा अधिक करु तसा त्याचा आवाका आपल्या लक्षात येईल.एक मात्र पक्के लक्षात ठेवा.आय.सी.टी.आपल्याला माहिती,संप्रेषण आणि तंत्रद्न्यान या तीन बाबीवर अत्यंत असे मोलाचे मार्गदर्शन करते.आणि जग पाहण्याचे,कवेत घेण्याचे कौशल्य प्राप्त करते.  

  ४ टिप्पण्या:

  1. Job and social work opportunity. We are provide village level technology.
   We are recruiting COORDINATOR PLEASE CALL-:7798191319

   प्रत्युत्तर द्याहटवा
  2. आशावादी रहा.हजारो मार्ग आहेत.ओनलाईन पैसे कमावण्याचे.....मला वाटते..तुम्ही कामात झोकून द्यायला हवे...प्रयत्न सोडू नका.यश आपलेच...माझ्या येणा-या पोस्ट मधे मी अधिक माहिती देईन.
   धन्यवाद.

   प्रत्युत्तर द्याहटवा
  3. मी (ICT) COMPUTER INSTRUCTOR आहे.पण यात भविष्यात काही संधी आहे का........

   प्रत्युत्तर द्याहटवा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या