• Breaking News

  रविवार, ५ जानेवारी, २०१४

  आज भूगोल व समुद्री जीवन समजून घ्या.भूगोल शिक्षकांसाठी.  तसे मी सर्व विषयाबद्दल माहिती देत आहे..मला जोपर्यंत समाधानकारक माहिती मिळत नाही.तोपर्यंत ती तुमच्यापर्यंत येत नाही.मी आज समुद्री जीवन व विविध प्राण्यांबद्दल माहिती असलेल्या वेबसाईट वर घेउन जाणार आहे.या वेबसाईट्चे एक वैशिष्ट्य़ मला आवडले ते म्हणजे शिक्षकांसाठी एक विभाग आहे.या विभागात सर्व भौगोलिक बाबीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.यात तुम्हाला प्राण्यांचे व पक्षांचे आवाजही ऐकायला भेटतील ते तुम्ही जतन करुन ठेवू शकता.दुर्मिळ असे प्राणी व पक्षी येथे पहावयास भेटतात.
  ही वेबसाईट खास पर्यावरण प्रेमींसाठी काम करणारी असून तुमचे पर्यावरणविषयक जर काही कार्य असेल तर येथे दाखल करा.ती समिती अभ्यास करेल.जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला ती मोठी रक्कम अभ्यास करण्यासाठी व जगाची सफ़र करण्याची संधी देईल.आज पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे म्हणून भले मोठे लेख लिहून पर्यावरण बचतीसाठी काहिच न करणा-यांची संख्या वाढत आहे.मी अशा वेबसाईट पाहतो तेंव्हा समाधान वाटते.

  एक सूचना तुम्ही जिथे भेट द्याल तिथे आपला ईमेल देण्यास म्हणजे सबस्क्राईब करण्यास विसरु नका कारण भविष्यात तुम्ही भेट नाही दिली तरी त्यांची नवीन माहिती आपल्याला ईमेल द्वारे प्राप्त होते.आज एवढेच.
  त्या छान वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या