• Breaking News

  गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

  एक ललित तुझ्यासाठी...............................!


  प्रिय खूप वर्षानी तुझ्या आठवणींना शब्दरुप देतोय...
  कशी आहेस ?
  कोठे आहेस ?
  जिथे असशील तिथेही आठवणींचे वारे वहात असतील.
  मी असे म्हणत नाही,तू खुशाल रहा,सुखी रहा.
  कारण,
  परीसाला काळजी नसते स्वसुखाची..
  तू एक परीस...
  अशीच एकदा आपली भेट झाली...
  फ़ेब्रुवारीत ....तो दिवस व्हेलेंटाईन डे नव्हता हे नक्की.
  मी अलगद तुझ्या डोळ्यात पाहिले...आणि कसलाही संकोच,विचारणा न करता तू संमती दिलीस....
  मी बेभान झालो होतो ...तू मला सावरलस...
  म्हणालीस...
  माणसानं नेहमी शांत वा-याच्या झुळुकेसारखं असावं...वादळ होऊ नये...
  कारण...
  वादळं नेहमी विध्वंस करतात.हे तुझं समंजस तत्वद्न्यान मला खूप काही सांगून गेलं...
  एकदा पावसात भिजताना आपण निसर्गापेक्षा एकमेकांच्या सौंदर्याचा आनंद घेतला...
  तुझ्या गालावर थांबलेले जळथेंब ...
  ओठांना स्पर्श करण्यासाठी आसूसलेले जलबिंदू...
  पाण्याच्या थेंबांनी केसात माळलेले जलमोती...
  त्या पाण्यात भिजलेली तुझी ओढणी वा-याच्या दिशेने हेलकावे खाण्याची विसरुन तुलाच बिलगली...
  अशा वेळी मी जगातल्या अत्युच्च सौंदर्याचा आस्वाद घेतला....
  मी नुसते पहात होतो...
  माझी तुला बेभान करणारी नजर सहन न झाल्याने ...
  तू मला अचानक बिलगलीस....म्हणालीस.....
  असंच आपल्याला आयुष्यभर जगता येईल का ?
  मी हो म्हणालो... पण मनात काहुर माजले...शंकेचे.....
  दुस-या वर्षी व्हेलेंटाईन आला...
  मी म्हणालो...
  फ़ुले देऊ....
  तुझ्यासाठी गजरा घेऊ...
  तू म्हणालीस...
  प्रेमाला काळाची ,दिवसाची, क्षणाची प्रतीक्षा नसते...तू म्हणजे माझ्यासाठी दररोज व्हेलेंटाईन डे आहे....
  तुझ्याकडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भव्य ,दिव्य असायचे...
  असे काय रसायन तुझ्यात होते ...याचा शोध अद्याप मला लागला नाही...
  तुझं प्रेम म्हणजे ,अहंकार नाही,.हट्ट नाही, क्रत्रिमपणा नाही,बडेजाव नाही,मागणी नाही,घेण्याची आतुरता नाही,देण्याचा संकुचितपणा नाही,हव्यास नाही,अट्टाहास नाही,आभास नाही,भासही नाही,.मिथ्या शब्द नाही,अबोलपणा हाच तुझा संवाद ....
  स्मितहास्य हाच तुझा दागिणा...
  घेण्याबद्दल निवड नाही...देण्याबद्दल तक्रार नाही...
  किती भाव ...आठवणी...स्वभावाचे कंगोरे मी जपून ठेवलेत...
  काही दिवसातच मला शतजन्माची शिदोरी प्राप्त झाली.....
  एक दिवस मात्र वेगळा उगवला....
  तू गाव सोडून गेल्याचे समजले...
  नियतीने आपला डाव साधला..
  मी निशब्द झालो...शोध घेतला नाही...विचारणा नाही...दु:ख नाही...वेदना नाही....
  बस्स..
  एका क्षणात मी ठरवलं...जी मुर्ती आपण -हद्यात ठेवली तिचीच पूजा,तिचीच उपासना..तिचेच स्मरण...तिच्याच आठवणी...तिच्याशीच संवाद ....तिलाच गोंजारणं...तिच्याशीच भांडणं...तिच्याशीच प्रेम करणं....बस्स यापेक्षा अन्य काही नाही....
  मी आजही तुझी सोबत करतोय..मला जाणीव आहे..मी जाणतो....मी अनुभवतो...तू माझ्यासोबतच आहेस....
  या शाब्दिक भावना मी शब्दबद्ध करतोय,कारण व्हेलेंटाईन डे चे तुझे तत्वद्न्यान आज मला प्रकर्षाने आठवतेय...
  हे शब्द ...या भावना चुकून जर तुझ्या वाचनात आल्या तर एक स्मित कर बस्स......
  एका प्रेमाच्या अथांग महासागराला,एका ओढ्याचे विनम्र स्मरण......
  तुझा...........!

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या