• Breaking News

  बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

  शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एक अफ़लातून शासन निर्णय.....

  शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या धोरणानुसार राज्य शासनाने सर्वदूर प्राथमिक शाळा उपलब्ध करुन दिल्या.आज राज्यात ६७,००० प्राथमिक शाळा असून सुमारे १.६३ कोटी विद्यार्थी पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.आतापर्यंतचे सर्व तुकडी संबधित शासन निर्णय अधिक्रमित केले असून दि.२८ जानेवारी २०१३ व १३ डिसेंबर २०१३ रोजीचेच शासन निर्णय आता ग्राह्य धरण्यात येणार आहेत.हे दोन्हीही निर्णय आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे.
  तुकडीसंदर्भातील हा निर्णय एक प्रकारे शिक्षणाची चेष्टा करणारा म्हणावा लागेल.व्यवस्थापनाच्या शाळांतील पाचवा वर्ग आता जि.प.कडे वर्ग करण्यात येणार आहे.तेथीक शिक्षकांचे काय? कसे? करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.दुसरीकडे अतिरीक्त होणारे शिक्षक आता समावेशीत केले जातील.
  पालक व विद्यार्थी नाईलाजास्तव जि.प.च्या शाळांत आपले विद्यार्थी प्रवेश देतात त्यांना आता एक वर्ष थांबावे लागणार आहे.दुसरीकडे व्यवस्थापनाच्या शाळा भरमसाट फ़ी आकारतात त्यांचा एक वर्ग आता बंद होणार आहे.तुकडी संख्या आता बदलणार असून त्याबाबत चे निर्देष देण्यात आले आहेत.प्राथमिक शिक्षणाचा स्तर आता बदलणार असून जि.प.च्या शिक्षकांची संख्या वाढणार आहे.
  सदरील शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक कोपी करुन ब्राउजर मधे पेस्ट करा.
   
  https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201401021540253121.pdf

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या