• Breaking News

  गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

  विमा कंपन्यांच्या फ़सव्या जाहिराती आणि आपण.समजून घ्या एक वास्तव.

  आज भारतात अग्रगण्य २० विमा कंपन्या कार्यरत आहेत.या कंपन्या जाहिरातीचे सर्व नियम तोडून विविध माध्यमात जाहिराती करताना दिसत आहेत.आपल्या देशात जाहिराती केल्या जातात त्याच्या पाठिमागची वास्तवता तपासणारी यंत्रणा कार्यरत नाही.जसे दैनिकात, "सदरील जाहिराती वाचकांनी तपासूणच व्यवहार करावा.वर्तमानपत्र त्याच्याशी जबाबदार राहणार नाही." असे सावध सल्ले दिले जातात.सद्या तरी छोट्या जाहिराती वाचणे म्हणजे स्वत:ची फ़सवणूक करुन घेणे आहे.असो.
  या विमा कंपन्या फ़ार गोड सल्ले देतात.दलाल खोट्या बाबी पटवून देण्यात फ़ार पारंगत असतात. त्यांचे सल्ले ऐकण्यापेक्षा एक चहा पाजवून पाठवणे केंव्हाही चांगले.आपण कंपनीच्या व आपल्या भल्यासाठी एका सज्जन माणसाचा खिसा कापतोय याचा विचार ते करत नाहीत. एका पोलिसीचे फ़ायदे  कालमर्यादा आणि रक्कम यांचा ताळमेळ कधीही लागत नाही.
  तुम्ही ठरवा सद्या एखाद्या पोलिसीचा सर्विस चार्ज आपल्याकडून आकारला जाणार आहे.म्हणजे ४५० रु.महिना एका पोलिसीचे आपण भरणार असू तर आपल्या पोलिसीखात्यात ४०० रु.जमा होतील.अशा काही प्लैन्स सद्या बाजारात आल्या आहेत.
  आपण घेतलेला प्लैन भविष्यात कितपत फ़ायद्याचा ठरणार आहे.याचा विचार करा.मिळणारे व्याज आणि जोखीम परवडणारी आहे का ? य़ाचा विचार करा.
  हे विचार माझेच नाहीत तर अशा लाखो ग्राहकांचे आहेत.आता मी तुम्हाला एका विशेष चर्चा मंचावर घेउन जाणार आहे.तिथे पहा काय मते आहेत विम्याबाबतची.येथे क्लिक करा.


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या