• Breaking News

  शनिवार, १० मे, २०१४

  चला आईच्या आठवणींच्या प्रदेशात जाऊ या.................

  मित्रांनो आज मदर्स डे आज जग एका महान भावनेशी आत्मचिंतन करण्यात मग्न होणार आहे. झालेच पाहिजे कारण आपण जे आज आहोत ते आईमुळे.आई एक असे व्यासपीठ जिथे सर्व ग्रंथ एकत्र येतात जीवनाचे तत्व तिनेच सांगावे आणि तिनेच जगावे.

  तिच्या  रागवण्यातही  वेगळाच गोडवा तिच्या ममतेत सा-या  मायेच्या नित्य नव्या जगाचा गोडवा. तापाने फणफणत असलेल्या आपल्या बाळासाठी   रात्रभर जागून काढणारी ती आईच. 
  सर्वत्र दिवे लागतात आईच्या डोळ्यातील ज्योत मात्र कायमची बाळांना प्रकाश देण्यासाठी सज्ज जरासं कुठे लागले तर आई "सावलीत मर" असा शब्द प्रयोग करायची यातला ममतेचा स्पर्श फ़क्त मुलालाच कळतो.तिच्या असंख्य आठवणी घेऊन आपण लहानाचे मोठे होतो.पण ही च आई जेंव्हा हरवते तेंव्हा आपल्या पाठीवरुन मायेचा हात फ़िरविणारा आता कोणीही उरला नाही.असे खुशाल समजा.कारण आई ही जन्माची शिदोरी असते पण ती पुरतही नाही आणि उरतही नाही.प्रत्येक ठिकाणी देवाला जाणे शक्य होत नसावे म्हणून त्याने आईची निर्मिती केली.हे जग आई आहे म्हणून महान भावनेत गुंतलेले आहे. भावनेचा परिपोष आईनेच केला आपल्या जीवनात. या महान आईच्या उपकाराची परतफ़ेड कोणालाही करता आली नाही करता येणार नाही. कारण हे दानच असे आहे. ज्याची परतफ़ेड अशक्य आहे.बाळाला जखम झाली तर तिच्या डोळ्यात टचकन पाणी येते ही भावना देवाने फ़क्त तिच्याकडेच ठेवली.
  आपण आईमुळेच श्रीमंत असतो. आई नसेल तर आपली गणती भिका-यामधे समजा. आईचा हा ठेवा आपण जन्मभर सांभाळला पाहिजे.मित्रांनो यानिमित्तांने आपल्यासाठी आई साठी केलेल्या कवितांचे प्रकाशन बालभारतीने केले आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलोय.  आई ......
  आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
  ती हाक येई कानी, मज होय शोककारी

  नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
  आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी

  चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
  गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
  वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

  येशील तू घराला, परतून केधवा गे ?
  रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
  आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
  स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी


  -यशवंत


  ते पुस्तक पाहण्यासाठी व डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या