• Breaking News

  मंगळवार, ३ मे, २०१६

  भारतातील जंगलात आगी लावल्या जातात की लागतात.

  दरवर्षी उन्हाळ्यात जंगल धाय मोकलून रडते आणि माणूस मात्र मुग गिळून गप्प बसतो.निसर्गाने मन:पूर्वक केलेल्या झाडांच्या संवर्धनाचा कोळसा होतो.भारतात आगी आपोआप लागण्याचे प्रमाण एक टक्का आहे.पण लावल्या जाण्याचे प्रमाण मात्र अधिक आहे.जंगलच आपला रक्षण कर्ता आहे.हे मानवास कळलेच नाही.पर्यावरणवादी म्हणून थकले कित्येक मेले पण त्यांचे ऐकण्याचा शहाणपणा मात्र कोणी दाखवला नाही.आज जी अवस्था मानवजातीची झाली आहे त्यास हे बेताल वर्तन कारणीभूत आहे.जल, जंगल आणि जमीन याबाबत आम्ही कधी विचार केला नाही.ती वारेमाप वापरली याची फ़ळे आता भोगावी लागतील.वेळ निघून गेली आहे.आता फ़क्त सहन करणे एवढेच आपल्या हातात आहे.
  पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही. परिणामी, खर्च व्यर्थ जातो. शिवाय शासकीय विभाग लाकूड चोरांवर अंकुश लावण्यातही अपयशी ठरत आहे. यामुळे उन्हाळ्यातच मोठ-मोठ्या वृक्षांचा कोळसा होत असल्याचे दिसते. सध्या सर्वत्र झाडांतूनच धूर निघत असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.तयार रहा.आणि चिंतन करा वाटल्यास थोडे वाईट वाटेल.निसर्ग प्रेमीना वेड्यात काढणारी नौकरशाही,राजकारणी आणि ठेकेदार असल्यामुळे दाद कोणाकडे मागता.

  पर्यावरणाचा समतोल राखता यावा म्हणून वृक्ष लागवडीसह संवर्धन आणि वृक्षतोडीवर आळा घालण्याचे कार्य हाती घेतले जात आहे. असे असताना वृक्षतोड कमी होताना दिसत नाही. रस्त्याच्या कडेला असलेली महाकाय झाडेही लाकूड चोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक मार्गांवरील झाडे उन्हाळ्यात पेटविली जातात. परिणामी, संपूर्ण झाड कोसळते. हे धराशाही झालेले झाड लाकूड चोर कापून नेतात. यात प्रशासनाला कुठलाही महसूल मिळत नाही आणि पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. काही झाडे धुरे पेटविल्याने जळत असल्याचे दिसते. वन व बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.पण हे उपाय आतापर्यंत किती केले त्याचे परिणाम काय झाले हे तपासणे महत्वाचे आहे.

  आगी का लावल्या जातात हे पाहिले तर डोके सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.

  *वन परिसरात काही लोक असे असतात की त्यांना काम मिळत नाही.मग ते वनविभागाच्या संपर्कात येतात व आग लावण्याचे नियोजन करतात.मग लावलेली आग विझवण्यासाठी या लोकांना पाचारण केले जाते.त्यांना अंगारी म्हणतात.रोजगार मिळावा म्हणून आग लावा.
  *काही वेळा वन विभागातील कर्मचा-यांना आर्थिक विवंचना भासते मग काय करावे तर आग लावा आणि शासकीय पातळीवर प्रश्न उठवा मग शासन आदेश देते काहीही करा पण आग विझवा मग यासाठी टैंकर व मजूर दोन्हीही वापरतात.यातही पैसे खाता येतात.

  *स्थानिक लोक वन विभागाच्या कर्मचा-यास हाताशी धरुन वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा घाट घालतात.आणि वनवा पेटवला जातो प्राणी लपून बसतात आगी मुळे ते सैरावैरा पळतात मग शिकार होते.
  *आदिवासी मोहाची दारु बनवतात यासाठी मोह फ़ुले गवतात व्यवस्थित वेचता येत नाहीत.मग आदल्या दिवशी आग लावणे व पहाटे जाऊन वेचणे.

  *तेंदू व गोंद जमा करण्यासाठी आग लावतात.

  *उन्हाळ्यात हरिणांची शिंगे गळून पडतात त्याला बाजारात मोठा भाव आहे.मग हे शिंग सहज सापडावे म्हणून आग लावली जाते.
  *ब-याचवेळा जंगली प्राणी वस्तीत घुसतात शेळ्या गायी फ़स्त करतात.हे होऊ नये म्हणून आग लावली जाते.

  *कंत्राटदार तेंदू पत्ता व्यवस्थित वेचता यावा म्हणून झाडाखालील जागा नीटकी करतात.यासाठी आग लावावी लागते.
  वरील कारणांशिवाय आग लागू शकते पण ही च कारणे प्राथमिक मानावी लागतील.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या