• Breaking News

  शुक्रवार, १७ जून, २०१६

  ग्रामीण भागातील स्थलांतर होण्यास कारणीभूत प्रशासन.  गेल्या दोन वर्षापासून ग्रामीन भागाचे अर्थकारण विस्कटलेले आहे.याला कारणीभूत आहे ते प्रशासन आणि राजकारणी.याच्या खोलात जाऊन जर विचार केला तर आपल्याला नक्षलवादाच्या उदयाची किंवा तरुणाई च्या असंतोषाची कारणे यात दिसून येतात.
  ग्रामीण भागातील आलेली प्रत्येक योजना त्यात भ्रष्टाचार ठरलेला.अशी कोणतीही योजना नाही की त्यात भ्रष्टाचार झालेला नाही.ज्या योजना शासन स्तरावरुन राबवण्याच्या नियोजनाचे निर्देश शासन करते.त्यात कल्याणकारी योजना ही असतात पण आपल्याकडील नौकरशाही ही बेफ़िकीरीचा कळस केलेली आहे त्यामुळे प्रत्येक योजनेत खाउगिरी ठरलेली आहे.रस्ते दुरुस्ती.वित्त आयोग,ग्रामपंचायत निधी,रोजगार हमी योजना,जलयुक्त शिवार योजना,अनुसुचित जाती विकास योजना, आदिवासी विकास योजना,आर्थिक स्वावलंबन योजना,अशा विविध योजना ज्यात लोकांचा सहभाग व्हावा व त्यांना काम मिळावे अशा उद्देशाने या योजना जर राबवल्या तर ग्रामीण भागातील लोकांना काम मिळेल पण प्रशासन या फ़ंदात न पडता अधिक कामे यंत्राच्या साह्याने केल जातात.ज्यात मुबलक प्रमाणात टक्केवारी मिळते.कामे गुपचुप होतात.लोकांना कोणत्याही योजनेचा फ़ायदा होऊ द्यायचे नाही.त्यांचा सहभाग हा शुन्य ठेवायचा.जेणेकरुन योजेनेतील बहुतांश वाटा आपल्याला खायला मिळेल. याचा परिणाम असा झाला की,लोकांनी शासन आदेशानुसार कामाची मागणी केली पण त्यांना काम मिळत नाही.त्यांचे अर्ज गायब केले जातात.नाला सरळीकरण, विहीरी,पाणवठे.गाळ उपसा, तलाव आदि कामे मग जे.सी.बी, च्या सहाय्याने केली जातात.४०-६० हा कामाचा निकष येथे बाजुला सारला जातो.१०० टक्के काम मशिनच्या सहाय्याने केले जाते. यात सामान्य माणसाला जे काम मिळावयास ह्वे होते ते न मिळता घरी टक्केवारी आणून देणा-या राजकारण्याच्या मशिनला काम मिळते.

  ग्रांमीण भागातील विशेषत: परभणी ,हिंगोली, नांदेड, लातुर,यवतमाळ या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला.त्याची चौकशी करणे. दोषींना शिक्षा करणे,पुन्हा असे होणार नाही याची खबरदारी घेणे,ज्या मशिनच्या सहाय्याने कामे केली जातात त्या मशिन्स जप्त करणे,लोकाच्या हातांना काम मिळणे याला प्राधान्य देणे अशा विविध स्तरावर शासन कधीच काम करत नाही. मग लोक तक्रारी करतात.तक्रारीची दखल घेतली जात नाही.असे समजते त्यावेळी ते कामाचा अन्य पर्याय शोधतात. यातून मग स्थलांतर वाढते.आज ग्रामीण भागातील ६० टक्के लोक स्थलांतरीत झाले आहेत. यातून त्यांच्या कुटुंबाची घडी विस्कटलेली आहे. मुले सोबत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. आई वडील काम करत नसल्यामुळे ते गावीच आहेत. गावातील महत्वपूर्ण वर्ग,तरुणाई शहरात गेल्यामुळे गावातील महत्वाची शेतीची कामे खोळंबली. सर्वात मोठा परिणाम शहरांवर याचा ताण पडला.
  राहण्याचा प्रश्न.पाण्याचा प्रश्न,कामाचा प्रश्न,आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आदी समस्या शहरात निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्येच्या तळाशी जाऊन विचार करता..याला कारणीभूत प्रशासन आणि राजकारणी आहेत.ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम नाही. एक समाजाबाबतच्या संवेदनशून्य व्रुत्तीची चीड त्यांना येत आहे. मजुर मात्र आपला प्रश्न आता कोण सोडवणार ? याकडे आशाळभूत नजरेने पाहात आहे.
  ग्रामीण भागातील संपूर्ण यंत्रणा आज नौकरशाहीने नेस्तनाबूत केली आहे.यात विशेषत: महसूल आणि पंचायत समिती आणि जिल्हयावरची कार्यालये.यांच्या अकार्यक्षम शैलीमुळे कोणतीच कामे आज पैशाशिवाय होत नाहीत.प्रत्येक ठिकाणी पैसे मोजणे आज दुरापास्त होत चालले आहे.यंत्रणा खिळखिळी करणे हाच एकमेव धंदा आता शासकीय कार्यालयाचा झाला आहे. माहिती अधिकाराचा वापर करुन हे सर्व अनुभव प्रत्येक नागरिकाला घेता येतात.ग्रामीण भागातील सामान्य मजूर स्थलांतरीत होण्यामागे आज ही यंत्रणा आपल्या छुप्या मार्गाने हे सर्व करताना दिसत आहे.याचा फ़ट्का आज बसला आहे तो भविष्यातही बसत राहणार आहे.यात हे वास्तव नाकारता येत नाही.
     

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या