• Breaking News

  सोमवार, २० जून, २०१६

  वृक्ष लागवड कार्यक्रम ते वृक्षतोड व्यवसाय..जंगलाचे खरे मारेकरी कोण ?  जंगलाच्या बचावासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासन आणि राजकीय टेबलावर व व्यासपीठावर जे नियोजन होते ते अक्षरश: भारावून टाकणारे असते.गेल्या दहा वर्षापासून हाच कार्यक्रम चालू आहे. त्याची फ़ळे आपण आज चाखत आहोत.१०० टक्के जंगलापैकी आज जंगल ६० टक्के खाऊन टाकले लोकांनी यात आदिवासी अत्यल्प आहे.तर राजकारणी व तथाकथित उद्द्योग सम्राट य़ांनी जंगलाची जमीन घशात घातली आहे.आता ४० टक्के जंगल शिल्लक आहे.त्याचा पुळका म्हणून विविध योजना कागदोपत्री राबवणे व त्या गिळंक्रत करणे हा एकमेव व्यवसाय सद्द्या महाराष्ट्रात जोर धरुन आहे.

  दशलक्ष वृक्ष लागवड.वृक्ष संगोपन,रोपवाटीका,एक माणूस एक झाड आदी विविध कार्यक्रमातून जी पैशाची उधळपट्टी होते त्याचे आऊटपूट कोणीही पाहत नाही.सामाजिक वनिकरण, कृषी विभाग,वन परिक्षेत्र,कृषी महाविद्द्यालये,आणि पर्यावरण चळवळी यांनी रीतसर असा योजना हडप कार्यक्रम आखलेला आहे. दोन वर्षापूर्वी शासनाने शेतक-यांना रोपवाटीका दिल्या त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला.लोकांनी अनुदान उचलले.यात विशेषत: राजकारणी होते.त्यात सरपंच,पंचायत समिती सदस्य,जि.प.सदस्य.आणि प्रशासनातील योजना राबवणारे अधिकारी.झाडे लावली तीही निरुपयोगी.झाडे आली ती न्यायला कोणी तयार नाही.अनुदान उपयोगी झाडासाठी प्रत्यक्षात मात्र निरुपयोगी झाडांची उगवण.मग अशी झाडे कोण नेणार.ती झाडे अक्षरश: उकीरड्यात टाकण्यात आली.सदरील योजनेचे धनादेश उचलून शेतकरी पसार आणि अधिकारी टक्केवारी घेऊन मालामाल. अशा या विसंगत अवस्थेत सद्द्या आपले पर्यावरण सापडलेले आहे.


  औद्द्योगिक क्रांतीनंतर निर्वनीकरणाच्या वेगात अनिर्बंध झाला.१९५० नंतर तर जगभरात बेसुमार वनांची तोड झाली.२० व्या शतकाच्या सुरुवातीला पृथ्वीतलावर सुमारे ७ अब्ज हेक्टर क्षेत्रात जंगल होते.१९५० मधे ते ४.८ अब्ज हेक्टर एवढे कमी झाले.१९९५ च्या सर्वेक्षणानुसार पृथ्वीतलावर  फ़क्त २.३५ अब्ज हेक्टर क्षेत्रात वने अस्तित्वात होती.या सर्व घटनांचा विचार केला तर आपल्याला जंगलाची महत्वाची भूमिका काय हे समजून य़ॆईल.आज अनेक वेळा मृदासंधारण,जलप्रदुषण,वाढणारी वाळवंटे,अदृश्य होणारी वने,वनस्पती व प्राणी,भूजल पातळी खालावणे,इत्यादी बाबत वाचतो,बघतो.खरा प्रश्न जो आपल्या मनात येतो तो असा की,या सर्व घटनांचा किंवा प्रश्नाचे मूळ कोठे आहे तर ते निर्वनिकरणात.निर्वनीकरणामुळे या घटनाक्रमाची सुरुवात होते त्यांची परिणती पर्यावरणाच्या असंतुलनात दिसून येते.निर्वनीकरणामुळे मातीची धूप वाढते,वनस्पती नसल्याने भूस्तरावरुन पाणी वाहून जाते ते जमिनीत मुरत नाही.व भूजलाची पातळी खालवीत जाते.भूजल कमी होत गेल्याने अरण्ये सुकतात ,जंगल नसल्याने मातीची धुप आणखी वाढते.माती नसल्याने नवीन वनस्पती उगवत नाहीत व हळूहळू ह्या प्रदेशाचे रुपांतर वाळवंटात होते.असे चक्र सुरु होते.

  वने ही मोठ्या प्रमाणावर पाणी,बाष्प व पानांमधून वाफ़ेचे उत्सर्जन करतात.ज्या वाफ़ेचे रुपांतर ढगात होते व ते ढग सूर्यप्रकाश परावर्तित करतात..त्यामुळे हवामान सोम्य राहते.

  वनांमधे वनस्पतींमधे प्रचंड प्रमाणात कार्बन साठवलेला असतो व हा कार्बन जर वातावरणात मिसळला तर पृथ्वीचे तापमान वाढीस लागेल.सद्द्या हीच स्थिती आपणास अनुभवास येत आहे.

  भूसंरक्षण वनांमुळे जमिनीचे संवर्धन होते.झाडांच्या मुळांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.ही मुळे माती घट्ट धरुन ठेवतात त्यामुळे मातीची धूप नियंत्रित होते.

  भूमिगत पाण्याची पातळी उंचावते.अरण्यामुळे पावसाच्या पाण्याचा संपूर्णपणे निचरा न होता पाणी जमिनीत मुरु शकते.ज्यामुळे भूजलाची पातळी वाढतेव हेच भूजल वनस्पतींना कोरड्या मोसमात पुरक ठरते.

  वनामुळे जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.नद्द्यामधुन वाहून आलेल्या गाळामुळॆ  नद्याची पात्र उथळ होतात.व त्यामुळे नद्यांना पूर येतो.जर नदी किना-यावर मोठ्या प्रमाणात वनस्पती असतील तर पूराचा तडाखा एवढा बसत नाही.त्यामुळे होणारी जीव व वित्त हानी कमी होते.

  वनांमुळे मौसमी वा-याच्या मार्गात एक प्रकारचा अडथळा येऊन वारे अडवले जातात.वनांमुळे हवामान थंड व अल्हाददायक असल्यामुळे बाष्पाचे सांद्रीभवनात रुपांतर होते.व पर्जन्याचे प्रमाण वाढते.

  आज जगात अंदाजे ३० दशलक्ष लोक वनांवर आधारीत जीवन जगत आहेत.ह्या वन्य जमाती आपल्या अस्तित्वासाठी संपूर्णपणे जंगलावर विसंबून आहेत.ते जंगलातील विविध साधनसंपत्तीचा वापर करीत असतात.

  याशिवाय असंख्य प्राणी व कीट्क यांचे वसतिस्थान ही वनेच आहेत.ही मोठी भूमिका वने पार पाडत असताना.

  कर्मचारी ही जंगले खुडुन खाताहेत.नको त्यास परवाना देणे,वनांच्या योजनेसाठी आलेल्या रकमेचा अपहार करणे,जंगल माफ़ियांना सोबत घेऊन वनातील झाडांची कत्तल करणे.एकाच खड्यात दरवर्षी वृक्षारोपण करने व रीतसर अहवाल तयार करणे असा भालवेल कार्यक्रम चालतो.

  या सर्व प्रकारांबाबत आपण सर्वांनी विशेषत: पर्यावरणप्रेमींनी जर गाफ़िल राहण्याची बाजू घेतली तर मात्र येणारा भविष्यकाळ मानवजातीसाठी भयानक राहणार आहे.राजकारणी आणि प्रशासन याबाबतीत काहीही करणार नाही.ते काम निसर्ग प्रेमींना करावे लागणार आहे.     

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या