• Breaking News

  सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

  चला वापर करुया महाराष्ट्र लोकसेवा हक्क /नागरी सेवा अधिकार अधिनियमांचा...  शासनाच्या विविध विभागात कोणतेही काम वेळेवर होत नाही हा सर्वाधिक अनुभव आहे.पैशाशिवाय काम होत नाही हे ही वास्तव आता कोणीही नाकारत नाही पण आजही असे काही नागरिक आहेत की ते नियमानुसार काम करुन घेतातच शिवाय लाच मागत असतील तर ए.सी.बी .आहेच त्या विभागाला संपर्क करतात आणि मग जाळ्यात टाकून बिनधास्त होतात याचा परिणाम आजही सामान्य व शिस्तीने काम करुन घेणा-या नागरिकांचा वचक आहे. हे नाकारता येत नाही. शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश काढ्ण एक प्रकारे प्रशासनावर व कामचुकार अधिका-यावर वचक आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडुण केला जात आहे.
  कोणतेही काम करण्यासाठी रीतसर अर्ज दिला त्याची पोहोच घेतली तर संबंधित विभागाकडूण नोंदणी चे टोकण क्रमांक दिला जातो. त्यावर दिलेल्या अर्जाची तारीख असते.त्यावर हे काम किती दिवसात केले पाहिजे याची ही माहिती देणे अनिवार्य आहे.पण तसे लिहून दिले जात नाही. तेंव्हा सेतू केंद्रावर किंवा शासनाच्या संकेतस्थळावर याची माहिती आहे.त्याचा वापर करुन व सोबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश चा वापर करुन संबंधित अधिका-यास शास्ती /दंड लावण्याची  विनंती करुन शकता त्यांचे वरिष्ट याबाबतीत योग्य ती कार्यवाही करु शकतात हा अध्यादेश प्रामाणिक व लवकर सेवा नागरिकांना मिळाव्यात म्हणून आहे.त्याचा वापर आपण सर्वांनी करणे महत्वाचे आहे.आर.टी.आय.प्रतिनिधींनी  हा अध्यादेश अगोदर अभ्यासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावर भाग पाडावे.सदरील अध्यादेश डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  शिक्षण

  उपयोगी वेबसाइट

  मराठी बातम्या