Marathi Tech News

Marathi News Latest marathi news mumbai news technology news make money in marathi Mumbai Marathi News Updates news maratha

Ads Here

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

विविध स्पर्धा परिक्षांसाठी भारतातील एकमेव वेबसाईट..तीही खास विद्यार्थ्यांनी बनवलेली आपल्यासाठी.मित्रांनो आज स्पर्धेचे युग आहे.त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि ते आवश्यकही आहे.कारण गुणी आणि होतकरु व देशप्रेमी लोकच या व्यवसायात आले पाहिजेत. आज अवस्था फ़ार वाईट आहे .आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक व ईतर वर्ग-१ व वर्ग-२ चे जे यशस्वी उमेदवार आहेत.त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जातो.पण अधिक खोलात जाता त्यांच्याकडॆ करोडो रुपयांची संपत्ती आहे. मी आर.टी.आय.चे कार्य करतो अधिक खोलात जाऊन या अधिका-यांची संपत्ती तपासली असता डोके सुन्न होते.आणि असे लोक समाजाचे काय भले करणार
.काही अधिका-यांनी तर आपल्याकडील संपत्ती लपविण्यासाठी नातेवाईकांच्या नावावर जमिनी व घरे,सोने,प्लोट,कैश असा यांचा व्यवहार आहे.मग या लोकांनी काय म्हणून आपल्याला मार्गदर्शन करावे असा प्रश्न पड्तो.म्हणुन मी म्हणतो की .देशभक्त असणा-या व्यक्तींनीच या क्षॆत्रात यावे. अन्यथा उगीच अहंकाराच्या नावाखाली देशाला सामान्य जनतेस लुटू नये.
http://amzn.to/2vp1nw5
आज अभ्यास करणे आवश्यक झाले आहे.मग महागडी पुस्तके,महागडी क्लासेस यांना काही कमी नाही. पण त्यात वास्तव कमी आणि जाहिरातींचा भपका अधिक  मग काय करावे अशा वेळी कोणीतरी आपल्यासाठी कार्य करते आहे याचा आनंद होतो.आणि आपल्याला धन्यता वाटते.मला वाटते हे विद्यार्थी तर आहेत पण देशभक्त सुध्दा आहेत.कारण एवढ्य़ा विविध स्पर्धा परिक्षा  व त्यांची तयारी आपल्याला एकाच ठिकाणी मिळते आहेत.तिही मोफ़त.का घेऊ नये.घ्यावे अवश्य.आभारही मानावेत.देणा-याने देत जावे..घेणा-याने घेत जावे.घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावे......असच काही आपल्या आयुष्यात व्हावे.चला तर मग त्या वेबसाईटवर आणि भन्नाट अभ्यास करा. येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा